टोप (प्रतिनिधी) :  जिल्हापरिषद मतदारसंघात भरिव निधी दिला असून पुढील काळात अधिकाधिक निधी देवून भागाचे राजकारणविरहीत सर्वागींण विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे. असे मत भादोले मतदार संघातील जि.प. सदस्या मनिषा माने यांनी टोप येथे व्यक्त केले. त्या टोप येथे नुकसानग्रस्तांना प्रापंचिक साहित्याच्या वाटपावेळी बोलत होत्या.

यावेळी मनिषा माने म्हणाल्या की, कोणताही विकास करताना पाठपुरावा करण्याची खुप गरज असते. यामुळे नागरीकांची अधिक कामे होतात.  भादोले मतदार संघातील सर्व ग्रामपंचायतीने चांगले सहकार्य करुन चांगला निधी माझ्याकडून मिळवून घेतला आहे. यापुढेही असेच सहकार्य सुरुच ठेवणार असून सर्वच ग्रामपंचायतीना भरिव निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सरपंच रुपाली तावडे, उपसरपंच राजु कोळी, विठ्ठल पाटील, संग्राम लोहार, बाजीराव पोवार, रंजना पाटील, अंजना सुतार, दिपाली धनगर, आयशाबी मुल्ला, विनोद पाटील, पांडुरंग पाटील, एस एम पाटील, लक्ष्मण पाटील, ग्रामविकास अधिकारी डी. आर. देवकाते, ग्रा. पं. कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.