टोप (प्रतिनिधी) : सभासदत्व कमी झालेल्यांना त्यांचे अधिकार प्राप्त करण्यासाठी कायदेशीर लढा सुरु ठेवणार आहे. टोप गावातील सभासद नेहमीच आमच्या सोबत राहिले आहेत. ते नेहमीच असे सोबत रहातील असे मत माजी आ. अमल महाडीक यांनी टोप येथील सभासद संवाद यात्रेवेळी व्यक्त केले.

अमल महाडिक म्हणाले, कारखान्याकडून खते, किटकनाशके माफक दरात सभासदांना मिळत असुन सभासादानी त्याचा उत्तम उपयोग करावा. टोप परिसरातील ऊस कारखान्याला वाढला असून त्वरीत ऊसाची उचलही केली जात आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहे. तर गावातील पाणंदी रस्त्याचे कामही सुरु असुन ते पुढेही सुरुच ठेवणार आहे. सभासद शेअर्सची साखर वाढविण्याचा विचारही सुरु आहे. लवकरच सभासदांना त्याचा फायदा होताना दिसेल. असे महाडीक यांनी सांगितले.

यावेळी ग्रा.प.सदस्य विठ्ठल पाटील, अरुण गायकवाड, शंकर भोसले, सुनिल पाटील, माणिक पाटील, हिंदुराव मुळीक, गब्बर पाटील, सुनिल काटकर, सचिन पाटील, अजित पाटील, भिकाजी गायकवाड, अभय घोरपडे, सचिन पाटील आदी उपस्थित होते.