…तर ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारणार : संजय राऊत

0
367

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप नेत्यांनी केलेले आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप सिद्ध झाले नाहीतर ईडीच्या कार्यालयासमोर आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारले नाहीतर माझे नाव संजय राऊत नाही, असा इशारा शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता भाजप नेते किरीट सोमय्या यांना आज (सोमवार) येथे दिला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते.

राऊत म्हणाले की, ज्या पद्दतीने ही मंडळी अफाट, बेफाट, तोंडफाट आरोप करत सुटले आहेत त्यातून काही निष्पन्न होणार नाही. काहीही कागदं फडकावतात आणि आरोप करतात. प्रताप सरनाईक, राज्यातील प्रमुख नेते तसेच मी आणि माझ्या कुटुंबासोबत हेच केले. हिंमत असेल तर यांनी हे आरोप सिद्ध करुन दाखवले पाहिजेत. राजकारण, समाजकारण, पत्रकारितेत अनेक वर्ष काम करताना आम्ही खूप काळजीपूर्वक काम केले.