बायको परपुरूषासोबत पळून गेली : नवऱ्याचे १८ महिलांसोबत धक्कादायक कृत्य

0
118

हैद्राबाद (वृत्तसंस्था) : बायको परपुरूषासोबत पळून गेल्याचा राग मनात धरून एकाने १८ महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवून त्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी  बोरबंडा येथील ४५ वर्षीय आरोपी रामुलू याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांने १८ महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बायको परपुरुषासोबत पळून गेली होती. याचा राग आणि चीड मनात होती. यातूनच १८ महिलांशी शारीरिक संबंध ठेऊन त्यांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती आरोपी रामुलू यांनी हैदराबाद पोलिसांना दिली आहे. दरम्यान, महिलांशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर त्यांची हत्या करणाऱ्या या सिरीयल किलरला हैद्राबाद पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने १८ महिलांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती त्यांने दिली आहे.