नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या संसदेच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नुकताच पार पडला. अभिनेते आणि मक्कल निधी माईम पक्षाचे नेते कमल हसन यांनी या नव्या संसदेच्या गरजेबाबतचे काही सवाल उपस्थित केले आहेत.

सध्याच्या कठीण परिस्थितीतमध्ये देशाला खरंच या नव्या संसदेची गरज आहे का?, असा सवाल कमल हसन यांनी उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे. ‘चीनच्या भिंतीची निर्मिती होत असताना हजारो लोक मारले गेले. पण त्यावेळी प्रशासनानं दावा केला होता की लोकांच्या सुरक्षेसाठी भिंत उभारणं गरजेचं होतं. आता भारतात नव्या संसद भवनासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. देशात कोरोनाकाळात अर्ध्यापेक्षा अधिक लोकांना भूकेलं राहावं लागलं आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मग अशावेळी नव्या संसदेची गरज आहे का?”, असे कमल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.