शिरोळ (प्रतिनिधी) ; शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे बायको बरोबर का बोललास याचा राग मनात धरुन एका तरुणाला जबर मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर जखमी तौसिफ मणेर याला सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तौफिक मणेर यांनी डोक्यावर आणि पाठीवर लोखंडी रॉड, काठीने सलीम सुतार, अक्रम दबासे आणि आसिफ दबासे यांनी मारहाण केली केल्याची तक्रार कुरंदवाड पोलीस ठाण्यात केली आहे. हा गुन्हा हा काल (शनिवार) रात्री उशिरा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक केली आहे.