मुंबई (प्रतिनिधी) : महानायक अमिताभ बच्चन यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरविषयी ट्विटरवर एक चुकीचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यामुळे बच्चन यांना सचिन तेंडुलकरची माफी मागावी लागली आहे.

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये सचिन लेजेंड्स क्रिकेट लीग मध्ये खेळणार असल्याचे म्हटले होते. मात्र, सचिन ही स्पर्धा खेळणार नसल्याचे त्याच्या व्यवस्थापन टीमने स्पष्ट केल्यानंतर चुकीचा व्हिडिओ ट्विट केल्याचे बच्चन यांच्या लक्षात आले. त्यानंतर लगेच बच्चन यांनी ते ट्विट आणि व्हिडिओ डिलीटही केला. आणि लेजेंड्स क्रिकेट लीगचा एक नवीन व्हिडिओ शेअर केला. त्यानंतर त्यांनी आपल्या चुकीबद्दल माफीही मागितली.