कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील आघाडीचे न्यूज वेबपोर्टल असलेल्या ‘लाईव्ह मराठी’ आणि मुख्य प्रायोजक ‘तेजस एंटप्रायजेस’ तर्फे शहरातील प्रत्येक प्रभागातील प्रायोजकाच्या सहकार्याने प्रभागनिहाय घरगुती गणेश सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी विनामुल्य असून ज्या प्रभागामध्ये प्रायोजक नाहीत अश्या वाचकांनाही यामध्ये भाग घेता येणार आहे. लाईव्ह मराठीच्या वतीने संपूर्ण शहरासाठी टॉपच्या पाच व्हायरल बाप्पांना विशेष सन्मानित केलं जाणार आहे. या स्पर्धेसाठी लोकांची उत्कंठा वाढली असून खूप जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.कोल्हापूरतील सर्वात अग्रेसर डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘प्रभागातील आणि शहरातील सर्वोत्कृष्ट व्हायरल बाप्पा’ अशी अनोखी स्पर्धा आहे.

असे आहे स्पर्धेचे स्वरुप!

‘लाईव्ह मराठी’च्या वतीने, kolhapurfestivals.com व मिडियाटेक यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मुख्य प्रायोजक ‘तेजस एंटप्रायजेस’ यांच्यावतीने अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्या घरगुती गणेश सजावट करून या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. १० सप्टेंबर २०२१ रोजी गणेश चतुर्थीच्या दिवसापासून आपल्या घरातील सजावट केलेल्या गणेशाचा व्हिडीओ kolhapurfestivals.com या वेबसाईटवर अपलोड करायचा आहे. व्हिडिओ अपलोड करण्याची मुदत १५ सप्टेंबर पर्यंत राहणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचे मार्गदर्शन, व्हिडिओ रेकॉर्डिंगबाबतचे मार्गदर्शन, नियम व अटी kolhapurfestivals.com या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

विजेता कोण ठरणार ?

सर्वात जास्त लाईक्स, कमेंटस आणि शेअर मिळवणाऱ्या व्हिडिओनां बक्षीस मिळवण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेतील स्पर्धकाने आपल्या बाप्पाचा व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. प्रत्येक प्रभागात पहिल्या पाच स्पर्धकांना गुणानुक्रमे आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत. या बक्षिसांचे वितरण ज्या-त्या प्रभागातील प्रायोजकांद्वारे केले जाणार आहे. याशिवाय ‘लाईव्ह मराठी’च्या वतीने शहरातील टॉपच्या पाच ‘सर्वोत्कृष्ट व्हायरल बाप्पा’ ठरणाऱ्या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेत बक्षीस जिंकण्याची दुहेरी संधी असणार आहे. त्यामुळे कोण होणार प्रभागाचा आणि शहराचा सर्वोत्कृष्ट व्हायरल बाप्पा याची उत्कंठा सर्वांना लागून राहिली आहे. ही स्पर्धा शहराच्या जवळच लागून असलेल्या कळंबा, पाचगाव, मोरेवाडी, कंदलगाव, सरनोबतवाडी, बालिंगा, शिंगणापूर, उंचगाव या ग्रामीण भागासाठीही खुली करण्यात आली आहे. येथील वाचकांच्या खास मागणीस्तव त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

सर्व व्हिडीओंचे प्रभागनिहाय लाईव्ह मराठीच्या व kolhapurfestivals.com च्या तज्ञांमार्फत परीक्षण केले जाणार आहेत.

सर्व सहभागी स्पर्धकांना आयोजकांमार्फत ई- सहभाग प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. व्हिडिओ लाईव्ह मराठी न्यूज चॅनेलवर प्रसिद्धही केले जाणार आहेत.

प्रायोजक होऊन घरोघरी पोचण्याची संधी !

शहरातील नगरसेवक पदाची आगामी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवार एक प्रभावी प्रचार माध्यम म्हणून लाईव्ह मराठीचा उपक्रम आगात उपक्रमास प्रायोजकत्व देत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या घरी त्या घरातील गणेशाची आकर्षक सजावट शहर व जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. तर सहभाग इच्छुक उमेदवार आपल्या प्रभागातील प्रत्येक घरात आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे.

या स्पर्धेचे तज्ज्ञ म्हणून कोल्हापुरातील मिडियाटेक ही कंपनी तंत्रज्ञान व सोशल मिडिया मार्केटिंगचे काम पाहत आहे. सध्या या स्पर्धेसाठी ऑनलाईन नावनोंदणी सुरु आहे. नोंदणी केलेल्या स्पर्धकांना या स्पर्धेबाबतचे अपडेटस व्हॉटसअपवर मिळत राहतील.