कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूरमधील सर्वात अग्रेसर असणाऱ्या डिजिटल चॅनेल लाईव्ह मराठीतर्फे सर्वात मोठी घरगुती गणेश सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. याचबरोबर आता जिल्ह्यातील (ग्रामीण) तरुण मंडळांसाठीही आदर्श करिअर अकॅडमीप्रस्तुत लाईव्ह मराठीतर्फे मंडळाचा सर्वोत्कृष्ट व्हायरल बाप्पा हि स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.

लाईव्ह मराठी, कोल्हापूर फेस्टीव्हल डॉट कॉम आणि मिडिया टेक यांच्या उत्कृष्ट नियोजनातून शहरात प्रभागनिहाय तसेच परिसरातील गावांमध्ये घरगुती गणेश सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याला सर्वच स्तरातून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

याचबरोबर आदर्श करिअर अकॅडमी प्रस्तुत लाईव्ह मराठीच्यावतीने जिल्ह्यातील (ग्रामीण) सर्व तरुण मंडळांसाठी कोण होणार जिल्ह्यातील मंडळांचा सर्वोत्कृष्ट व्हायरल बाप्पा? ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये तरुण मंडळांसाठी कोणतेही नोंदणी शुल्क आकारण्यात आलेले नाही. जिल्ह्यामध्ये सर्वोत्कृष्ट पाच मंडळांना लाईव्ह मराठीच्या वतीने गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी लाईव्ह मराठीच्या ग्रामीण प्रतिनिधीशी संपर्क साधावा किवा आपल्या मंडळाचा २ मिनिटांचा व्हिडिओ बनवून लाईव्ह मराठीच्या 8380020502 वॉटस्अप क्रमांकावर तयार करून पाठवावा. यामध्ये मोबाईल आडवा करून शूटिंग करावा. स्पर्धेसाठी व्हिडिओ पाठवण्याचा कालावधी १९ सप्टेंबरपर्यंत आहे. सर्वात जास्त लाईक्स, शेअर आणि व्हूज मिळवणाऱ्या सर्वोत्कृष्ट पाच मंडळांना जिल्ह्याचा (ग्रामीण) व्हायरल बप्पा म्हणून लाईव्ह मराठीतर्फे गौरविण्यात येणार आहे.

व्हिडिओ पाठवत असतना त्यामध्ये तो मंडळाचे अध्यक्ष अथवा पदाधिकारी यांच्या वाटसअप क्रमांकावरूनच तो आला असला पाहिजे, याचबरोबर मंडळाचे नाव, गाव आणि तालुका तसेच अध्यक्ष यांचा वाटस अप मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. लाईव्ह मराठीच्या नियमाप्रमाणे व्हिडिओ आला नाही किंवा चुकीचा व्हिडिओ नाकारण्याचा अधिकार लाईव्ह मराठीने राखून ठेवला आहे.