कोल्हापूर (प्रतिनिधी) : खासदारकीच्या बदल्यात विधान परिषदेची आमदारकी देऊ त्याबदल्यात राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करा असा प्रस्ताव महाविकास आघाडी‌ कडून देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील हीच ऑफर महाविकास आघाडीच्या समोर ठेवली आहे की भाजपा विधान विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीला  एक जागा सोडेल त्यामुळे महाविकास आघाडीने निवडणुकीतून माघार घ्यावी असा प्रस्ताव ठेवला आहे. सध्याच्या घडामोडी बाबत एका तासात चित्र स्पष्ट होइल.

दोन्ही पक्ष एकमेकांना दिलेल्या ऑफर बाबत पुढील एका तासाभरात बोलणी करणार आहे त्यानंतरच  राज्यसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. भाजप महाविकास आघाडीची ऑफर स्वीकारेल असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी सहा जागा आहेत परंतु या सहा जागांसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे त्यामुळे या निवडणुकीत खरी रंगत आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पक्ष आज कोणत्या राजकीय चाली  खेळणार व त्यातून काय पदरात पाडून घेणार  या कडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जगासाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात लढत यांच्यात लढत होणार का याचे चित्र आज दुपारपर्यंत स्पष्ट होईल. सध्याच्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या आमदारांच्या संख्येनुसार भाजपचे दोन उमेदवार विजयी होऊ शकतात तर शिवसेना, राष्ट्रवादी, आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे शिल्लक राहिलेली अतिरिक्त मते महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांच्या बळावर शिवसेना सहावी जागा आपल्या पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहे. तर भाजपला देखील सहावी जागा जिंकण्यासाठी 13 मतांची आवश्यकता आहे, या सर्व पार्श्वभूमीवर चंद्रकांत दादा यांनी दावा केला आहे की सहावी जागा जिंकण्यासाठी भाजप कडे पुरेसे संख्याबळ आहे त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे म्हटले जात आहे. सध्याच्या चित्रानुसार कॉंग्रेस बक फुट वर आहे. काँग्रेस पक्षाने दिलेला उमेदवार महाराष्ट्रातील अनेक आमदारांच्या पचनी पडलेला नाही , महाराष्ट्रातले काही आमदार नाराज असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीला दगाफटका होऊ नये यासाठी राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महा विकास आघाडी कडून प्रयत्न सुरू असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. सध्याच्या घडामोडी पाहता कोणता पक्ष विधानपरिषदेच्या जागेची ऑफर स्वीकारणार हे तासाभरात कळून येईल.