शिरोळ तालुक्यातील ‘हा’ प्रेमवीर कोण..?

0
143

शिरोळ (प्रतिनिधी) : युद्धात आणि प्रेमात सगळे माफ असे ब्रिदवाक्य ठरलेच आहे. याचीच प्रचिती शिरोळ तालुक्यात आली आहे. धरणगुत्ती ते जयसिंगपूर या अडीच किलोमीटर मार्गावर एका प्रेमवीराने ‘आय लव्ह यू’ आणि ‘आय मिस यू’ असे ऑईलपेंटने रस्त्यावरच रेखाटले आहे. आता हा प्रेमवीर कोण याची चर्चा तालुक्यात जोरदार सुरु आहे.

शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती गावात प्रेमाचा अगळा वेगळा प्रकार पहायला मिळाला आहे. चक्क आपल्या प्रियसीसाठी एकाने सुमारे अडीच कि.मी. डांबरी रस्त्यावर पांढर्‍या ऑईलपेंटने ‘आय लव्ह यू’ आणि ‘आय मिस यू’ असे लिहीले आहे. मात्र, हा जो कोण प्रियकर आहे त्याने या रस्त्यावर कधी लिहीले याचा कुणाला थांगपत्ता लागलेला नाही. तर गावाची हद्दीच्या अर्धा कि.मी. हे लिहीणे थांबवलेलं आहे. या मार्गावरून प्रवास करताना रस्त्यावर लिहीलेले शब्द पाहून सर्वच वाहनचालक आणि नागरिक अचंबित होत आहेत. आता या प्रेमवीराची चर्चा तालुक्यामध्ये होऊ लागली आहे.