मुंबई (प्रतिनिधी) : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळला आहे. त्यातच खिस्रमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्य सरकारने महापालिका क्षेत्रात रात्रीच्या संचारबंदी जारी केली आहे. त्यानुसार रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत कशावर बंदी असेल. याबाबत नागरिकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. संचारबंदीत नागरिकांना घराबाहेर पडता येणार आहे. मात्र, चारपेक्षा अधिक लोकांची गर्दी करता येणार नाही. या नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.  

रात्रीच्या संचारबंदीत कशाला परवानगी आणि कशावर असेल बंदी घ्या जाणून

  1. नागरिकांना घराबाहेर पडता येईल. परंतु जमाव करता येणार नाही.
  2. अत्यावश्यक कामासाठी दोघे जणांना घराबाहेर पडण्याची परवानगी
  3. दुचाकी आणि कारमधून चारपेक्षा जास्त जणांना प्रवास करता येणार नाही.
  4. कामावरुन उशिरा सुटणाऱ्या लोकांना संचारबंदीच्या काळात प्रवास करता येणार
  5. अत्यावश्यक सेवा-सुविधा देणाऱ्या नागरिकांना संचारबंदीची सक्ती नाही.
  6. पब, हॉटेल, सिनेमागृहे अशा करमणुकीची आस्थापने रात्री अकरा वाजता बंद होतील.