योग्यता, पात्रता नसलेल्यांना काय म्हणावे : अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला  

0
76

मुंबई (प्रतिनिधी) : ज्यांची योग्यता नाही, पात्रता नाही. त्यांनी काय टीका करावी, ज्या पवारसाहेबांनी समाज आणि राजकारणात ६० वर्ष काम केले आहे. महाराष्ट्राची जाण असणारे नेते आहेत. दिल्लीमध्ये ज्यांच्या शब्दाला वजन आहे. ते सर्वांनी पाहिले आहे. अशा वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सारख्याला पवार साहेबाबद्दलचे विधान शोभत नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाटील यांच्या टीकेचा समाचार घेतला.

यावेळी अजित पवार म्हणाले की, ऐकेकाळी साहेबांबद्दल काय विधान केले आहे. हे सर्वांना आठवत असेल, त्यामुळे त्यांचे आजचे विधान म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धी म्हणावी लागेल. दरम्यान, राजकारणात येण्यापूर्वी मला पवार मोठे नेते वाटायचे, मात्र राजकारणात आल्यावर कळाले ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी एका मेळाव्यात शरद पवार यांच्यावर केली होती. या टीकेला अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले.