आत्महत्येआधी शीतल आमटेंनी केलेल्या ट्विटचा काय असेल अर्थ..?    

0
173

नागपूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांच्या कन्या व महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे–करजगी यांनी आज (सोमवार) आत्महत्या केली. त्याआधी शीतल यांनी त्यांच्या ट्विटर आणि फेसबुकला एक पेंटिंग शेअर केली आहे.

ही पेंटिंग त्यांनी स्वत: काढली आहे. या पेंटिंगवर त्यांचे नाव आणि २९ नोव्हेंबर २०२० अशी तारीखदेखील आहे. विशेष म्हणजे ही पोस्ट शेअर करताना त्यांनी War and Peace म्हणजेच युद्ध आणि शांतता अशी सूचक कॅप्शन दिली आहे.

मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला होता. शीतल आमटे या सर्व वादाच्या केंद्रस्थानी होत्या, असे सांगितले जात आहे. हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच त्यांनी आत्महत्या केल्याने सामाजिक वर्तुळाला धक्का बसला आहे.