दिल्लीत केले ते आता कोल्हापुरात करणार : दुर्गेश पाठक

0
61

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विकासाचे दिल्ली मॉडेल हे राजर्षी शाहूंच्या विचारांशी आणि कृतीशी प्रेरित आहे. जे काम आम्ही दिल्लीत केले तेच आता कोल्हापूरच्या प्रत्येक गल्लीत करायचे आहे. असे प्रतिपादन आम आदमी पार्टीचे राज्य प्रभारी दुर्गेश पाठक यांनी सांगितले. ते आज (रविवार) महानगरपालिका निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूरात आले असता बोलत होते. यावेळी सह-प्रभारी दीपक सिंगला  उपस्थित होते.

यावेळी दुचाकी रॅली कावळा नाका येथून काढण्यात आली. तसेच प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे आणि  सदस्यांच्या हस्ते ‘हे आम्ही करणारच’ या घर-टू-घर प्रचार मोहिमेचा शुभारंभही करण्यात आला.

यावेळी दुर्गेश पाठक म्हणाले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले विकासाचे दिल्ली मॉडेल हे राजर्षी शाहूंच्या विचारांशी व कृतीकार्यक्रमाशी प्रेरित आहे. जे काम आम्ही दिल्लीत केले तेच आता आम्हाला कोल्हापूरच्या प्रत्येक गल्लीत करायचे असल्याचे यावेळी पाठक यांनी सांगितले. तसेच या मोहिमेद्वारे पक्षाच्या अजेंड्यावर असणाऱ्या सहा मुद्द्यांना घेऊन पक्षाचे कार्यकर्ते ८१ प्रभागांमध्ये घरोघरी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यामध्ये  महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारणार, सुसज्ज असणारे दवाखान्याचे वॉर्ड,  महापालिकेचे दाखले घरपोच देणार, महानगरपालिकेला पूर्ण कालावधीचा महापौर देणार, सोपा आणि सुलभ घरफाळा, शहरातील पार्किंग व्यवस्थेत सुधारणा असे मुद्दे आहेत. तर महापालिका निवडणूकीचे प्रचार प्रमुख संदीप देसाई यांनी, अनेक सक्षम उमेदवार आपल्या संपर्कात असल्याचे सांगितले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किशोर मंध्यान, राज्य सचिव धनंजय शिंदे,  जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील, संतोष घाटगे,  सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, सुनील मोरे, श्रेया हेगडे, विजय हेगडे, पल्लवी पाटील, राज कोरगांवकर, आदम शेख आदी उपस्थित होते.