सचिन वाझेंनी कोणता खुलासा केला की, शरद पवारांच्या अचानक पोटात दुखायला लागलंय ?

0
192

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सचिन वाझे यांने एनआयएसमोर असा कोणता खुलासा केला की, शरद पवार यांच्या अचानक पोटात दुखायला लागलं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं. आता तर असं वाटतंय की…दाल में कुछ कला नहीं बल्कि पूरी की पूरी दाल ही काली है, असे ट्विट दिल्ली भाजपचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी केले आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली आहे. तेव्हापासून वाझे दररोज नवनवीन खुलासे करत आहेत. यावरुन जिंदल यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. पवारांच्या अचानक पोटदुखीमुळे पश्चिम बंगालआधी महाराष्ट्रातच सत्तांतर होईल असं का वाटतंय, असेही कुमार यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.