कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील सुप्रसिद्ध इंजिनीयर आणि एस. व्ही. इंजिनीअरिंगचे प्रोप्रायटर संजय वसंतराव भस्मे (वय ५७) यांचे आज (शनिवार) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा लक्ष्मीपुरीतील कोंडाओळ येथे गेली पंचवीस वर्षे पंप्स अँड व्हॉल्सचा व्यवसाय होता.

संजय भस्मे यांचे प्राथमिक शिक्षण कोयना प्रकल्पामध्ये तर त्यांचे माध्यमिक शिक्षण वि.स. खांडेकर प्रशालेत झाले होते. न्यू कॉलेजमध्ये अकरावी-बारावी झाल्यावर त्यांनी इंजीनियरिंग कॉलेज, कराड येथे प्रवेश घेतला होता. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुली आहेत. ते रोटरी क्लब ऑफ होरायझनचे माजी सेक्रेटरी होते जुलै २०२१ पासून ते रोटरी क्लब होरायझनच्या ओके अध्यक्षपदी विराजमान होणार होते. ते दंतवैद्य आणि पत्रकार डॉ. राजेंद्र भस्मे यांचे ते कनिष्ठ बंधू होते.