मुरगूड (प्रतिनिधी) :  आशियाई वरिष्ठ गट पॉवरलिफ्टिंग स्पर्धत भारताला चार सुवर्णपदके पटकावून देणाऱ्या येथील जान्हवी जगदीश सावर्डेकरचे मुरगूड शहरात ढोल, ताशा, हलगी, फटाक्यांच्या आतषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले.

आशियाई वरिष्ठ गट पॉवरलिफ्टिंग स्पर्धत जान्हवीने ६९ किलो गटात  स्कॉड १९०, बेंचप्रेस १२०,  डेडलिफ १८७.५ टोटल ४९७.५ वजन उचलले. या तिन्ही प्रकारात प्रत्येकी सुवर्णपदक व ओव्हर ऑल कामगिरीबद्दल सुवर्णपदक अशी चार सुवर्णपदके पटकावली आहेत.  तिच्या  या ऐतिहासिक सुवर्णवेध कामगिरीबद्दल मुरगूडकरांच्या वतीने मुरगूड नाका,  बाजारपेठ, अंबाबाई मंदिर,  सावर्डेकर कॉलनीपर्यंत रॅली  काढण्यात आली.

या दरम्यान क्रीडाप्रेमीनी,  नागरिकांनी तिचे कौतुक केले. सुवर्णकन्या जान्हवीच्या घरी औक्षण करताना आई रेखा व वहिनी पूजा यांच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहत होते. यावेळी सत्कार प्रसंगी मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील, नगराध्यक्ष राजेखान जमादार, माजी उपनगराध्यक्ष संतोष वंडकर,  गब्बर भारमल, जगन्नाथ पुजारी,  नगरसेवक सुहास खराडे,  माजी उपनगराध्यक्ष बजंरग सोनुले, नगरसेवक आनंदा मांगले,  नगरसेवक भगवान लोकरे,  संजय भारमल,  पांडुरंग मगदूम,  अॅड सुधीर सावर्डेकर,  माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, राजू चव्हाण, दत्तात्रय साळोखे, मारुती ठाणेकर,  मधुकर मसवेकर,  दलित मित्र एकनाथराव देशमुख, माजी प्राचार्य महादेव कानकेकर,  युवराज सुर्यवंशी,  सचिन मगदूम,  प्रा. पृथ्वीराज कदम आदींनी तिला शुभेच्छा दिल्या.  यावेळी प्रशिक्षक विजय कांबळे,  शहरातील तालीम व विविध मंडळाचे कार्यकर्ते,  खेळाडू व नागरिक उपस्थित होते.