कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोप येथील आठवडी बाजार रद्द…

0
722

टोप (प्रतिनिधी) : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर टोपचा आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे. शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत  हॉटस्पॉट गावामध्ये टोप गाव आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून टोप येथील आठवडी बाजार रद्द करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे.

तसेच गावात आज (गुरुवार) सकाळी एका पुरुषाचा कोरोनाने मृत्यु झाला असून गावात पुन्हा कोरोनाची भिती वाढली आहे. यामुळे नागरीकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, मास्कचा वापर करावा, असे आवाहन ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाने केले आहे.