‘एफसी फुटबॉल आयलीग’ स्पर्धेसाठी बुधवारी महिला संघाची निवड

0
40

कोल्हापूर (प्रतिनिधी) : एफसी कोल्हापूर सिटीची फुटबॉल आयलीग या स्पर्धेकरिता महिला संघाची निवड चाचणी होणार आहे. ही चाचणी विभागीय क्रीडा संकुल, पद्माळा, संभाजीनगर येथे बुधवारी (दि.१७) दुपारी ४ वाजता होणार आहे.

फुटबॉलमध्ये राज्य आणि राष्ट्रीय इंडियन वुमन्स लीग लुधियाना व बेंगलोर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये एफसी कोल्हापूर सिटी संघाने नावलौकीक मिळवला आहे. आता आय लीग या स्पर्धेकरिता महिला संघाची निवड प्रक्रिया करण्यात येणार आहेत. तरी इच्छुकांनी विभागीय क्रीडा संकुल येथे निवड चाचणीला उपस्थित रहावे. अधिक  माहितीसाठी 9921582020, 9527772121, 8390991110 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एफसी कोल्हापूर सिटी च्या वतीने करण्यात आले आहे.