कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज (रविवार) कोल्हापुरातील शाहू स्मारक येथे  चिल्लर पार्टीच्या सिनेमासाठी काही शाळा मुलांना घेऊन आल्या होत्या. यात खास करुन कारभारवाडीच्या शाळेतील मुलं आली होती. ग्रामीण भागातील शिक्षक आता मुलं घेऊन शहरात यायला लागली, हे चिल्लर पार्टीचे यश आहे. एखाद्या संस्थेचे कार्यकर्ते मनापासून कामाला लागले की, काय होऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे चिल्लर पार्टीच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी नव्याने आलेल्या मुलांना चिल्लर पार्टीच्या या उपक्रमात,’ घरातली भाजी-भाकरी आणून खा, पण कुरकुरे सदृश्य काही खायचे नाहीत. हा नियम त्या मुलांना माहीती नव्हता. बऱ्याचजणांच्या पिशवीत कुरकुऱ्याच्या पुड्या दिसल्या. त्यावेळी या चिमुकल्यांना आयोजकांनी आवाहन केले आणि सर्वच चिमुकल्यांनी आम्ही कुरकुरे खाणार नसल्याची शपथ घेतली. त्यामुळे आजची चिल्लर पार्टी सर्वांनाच  प्रोत्साहित करणारी ठरली.