आंतरजिल्हा बदलीसंदर्भात दिवाळीनंतर निर्णय घेऊ : हसन मुश्रीफ

0
65

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सिंधुदूर्ग व इतर आंतरजिल्हा बदली संदर्भात दिवाळीनंतर मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (मंगळवार) येथे दिले. कागल येथील मंत्री मुश्रीफ यांच्या निवासस्थानी शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हातर्गंत बदली, शालेय वीज बिल, मुख्यालय आदी बाबत प्रश्न मांडण्यात आले. यावर मंत्री मुश्रीफ यांनी मंत्रालयात बैठक घेऊन सर्व प्रश्न निकाली काढण्याची ग्वाही शिष्टमंडळाला दिली.

यावेळी शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील, राज्य प्रसिद्धिप्रमुख (पुणे) हरिदास वर्णे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नितीन कदम, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, जिल्हा कार्याध्यक्ष नारायण नाईक, दादासो हुंबरे, ज्ञानेश्वर परदेशी, कागल तालुकाध्यक्ष अरविंद पाटील, जिल्हा विभागीय उपाध्यक्ष सदानंद यादव आदी उपस्थित होते.