दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नागरिक आणि निराधारांसाठी असणाऱ्या पेन्शन योजनांमधील जाचक अटी शिथिल करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. दिंडनेर्ली ( ता. करवीर) येथे २२ लाखांच्या निधी अंतर्गत रस्ता डांबरीकरण कामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

आ.ऋतुराज पाटील म्हणाले की, वृद्धापकाळ, निराधार पेन्शन योजनेच्या लाभार्थींना पेन्शन मंजूर पत्र आणि पासबुक वाटप करण्याचे काम माझ्या हस्ते झाले, हे माझे भाग्यच आहे. विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही.

याप्रसंगी वारकरी संप्रदाय मंडळाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय पाटील, पत्रकार संघाचे सदस्य सागर शिंदे, कुस्तीगीर संघटनेत निवड झालेले बाळासो राजिगरे, केंद्रीय राखीव पोलीस दलात निवड झालेले विनायक शेटे यांचा सत्कार करण्यात आला.

अध्यक्षस्थानी रामचंद्र पाटील होते. सुहास पाटील यांनी प्रास्ताविक केले. माजी सरपंच शांतीनाथ बोटे, किरण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी एकनाथ पाटील, मारुती निगवे, संभाजी बोटे, संजय परीट, दिगंबर पाटील, जयवंत गुरव, सुनिता गायकवाड, माधुरी जाधव, डॉ. लक्ष्मण काशीद, अरविंद शिंदे, हंबीरराव वाडकर, सर्जेराव काळूगडे, उमेश पाटील, प्रकाश काळूगडे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.