संग्रामसिंह देशमुखांच्या विजयासाठी मताधिक्य देऊ : समरजितसिंह घाटगे

0
267

मुरगूड (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर मतदारसंघातील पदवीधारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांना मताधिक्याने विजयी करू. त्यांना आमदार करण्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठा वाटा उचलावा, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी येथे केले आहे. पुणे पदवीधर निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.

यावेळी देशमुख म्हणाले की, मतदारसंघाची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोहोचणे शक्य होत नाही. तेव्हा सर्वांनी आपण स्वत: उमेदवार आहे, असे समजून कामाला लागावे.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, गोकुळचे संचालक बाबा देसाई, हिंदूराव शेळके, बिद्रीचे संचालक दत्तामामा खराडे, शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, राजे बँकेचे अध्यक्ष एम.पी.पाटील, सुनील मगदूम आदी उपस्थित होते. तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी स्वागत केले. सुनील सूर्यवंशी यांनी आभार मानले.