कागल (प्रतिनिधी) : कोरोना काळामध्ये कागल पंचतारांकित एमआयडीसीतील युवा लघुउद्योजकांचे व्यवसाय विस्कळीत झाले आहेत. ते पूर्ववत होईपर्यंत शासनाकडून त्यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. यासाठी लवकरच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी भेटून या संदर्भातील अनेक मागण्या, समस्या मांडणार आहोत, असे युवा नेते वीरेंद्र मंडलिक यांनी आज (गुरूवार) येथे सांगितले. कागल महावितरण कार्यालयात युवा लघुउद्योजक व अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी महावितरणने वीजबिल भरून घेताना टप्पे देऊन बिल वसूल केले पाहिजे. वीज कनेक्शन पूर्वसूचना न देता बंद करण्यात येऊ नये, तसेच वीजबिल वसूल करताना कर्मचारी वर्गाने ग्राहकांशी सभ्य भाषेत संवाद साधवा, अशा मागण्या  करण्यात आल्या.

यावेळी महावितरण विभागाचे अधिकारी विक्रम सपाटे, कागल पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कुराडे, पंचायत समिती सदस्य राहुल महाडिक, सदा साखरचे संचालक कैलास जाधव, एमआयडीसीतील युवा उद्योजक निलेश पाटील, मनोज पाटील, यासीन मकानदार, संदीप ढेरे आदी कागल परिसरातील युवक उपस्थित होते.