महापालिका निवडणूकीत आम्ही सर्व मार्ग अवलंबणार : राजेश क्षीरसागर

0
367

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिका निवडणुकीत पैशांचा वापर केला जातो. आम्हीही यावेळी सर्व मार्ग अवलंबणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे नेते माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिली.

क्षीरसागर म्हणाले की, महापालिकेच्या राजकारणात यावेळचे राजकारण बदलले आहे. शिवसेनेत चांगले वातावरण आहे. कोणतीही गटबाजी नाही. पक्षात सकारात्मकतेचे वारे आहे. विधानसभेच्या निवडणुकीत माझ्या पराभवास माझ्याच चुका मला भोवल्या. मी भोळेपणाने पुढे गेलो. मी आजवर कोणाच्याही कार्यक्रमाची भाषा केली नाही. तसेच मी कोणत्याही जातीपातीच्या विरोधात नसल्याचे त्यांनी सांगितले.