पत्रकारांना सतत पाठबळ देत राहू : प्रकाश पाटील

0
73

गारगोटी दि.२२ (प्रतिनिधी) : पत्रकार हा लोकशाहीचा मजबूत खांब असून पत्रकारांना येणाऱ्या कोणत्याही अडचणीसाठी आम्ही नेहमी खंबीरपणे त्यांना पाठबळ देत राहू, असे प्रतिपादन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी केले. ते फये (ता.भुदरगड) येथील सातेरीदेवी मंदिर परिसरात भुदरगड तालुका कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेलफेअर असोसिएशनच्या चिंतन बैठकीत बोलत होते.

यावेळी पत्रकार बी.के. कवडे यांनी पत्रकार संघटनेच्या कामकाजाची माहिती दिली. पुढील वाटचालीसंबंधी चर्चा करण्यात आली. पत्रकार शैलेंद्र उळ्ळेगड्डी यांनी संघटनेच्या कामाकाजाचे महत्वाचे मुद्दे मांडले.

बैठकीच्या सुरुवातीला पत्रकार संघटनेचे क्रियाशील सदस्य,  मार्गदर्शक अरविंद चोडणकर व पत्रकार नंदकुमार वेठे यांच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रध्दांजली वाहण्यात आली. पत्रकार सुभाष माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवसेनेचे भुदरगड तालुका प्रमुख अविनाश शिंदे, पत्रकार संघटनेचे भुदरगड तालुका अध्यक्ष पत्रकार आनंद चव्हाण, सचिव अजित यादव, शिवाजी खतकर, डी.वाय. देसाई, सुनिल खोत, प्रकाश सांडुगडे, संतोष पाथरवट, रवि देसाई, मोहन पाटील, डॉ.परशराम देवाळे, अरविंद सुतार, आर. के. पाटील, मंगेश कोरे, सविता माने आदी उपस्थित होते.