बी, सी, डी वॉर्डसह उपनगरात सोमवारी पाणी नाही येणार….

0
34

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील ए, बी, सी, डी वॉर्ड आणि संलग्नीत उपनगरे, ग्रामिण भागात सोमवार (दि.३०) पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच (मंगळवार) रोजी अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे महानगरपालिकेतर्फे सांगण्यात आले.

बालिंगा जलशुध्दीकरण केंद्रामध्ये उच्चदाब नलिकावरील एबी स्विच आणि हॉर्न गॅप बसवण्याचे काम सोमवारी होणार आहे. त्यामुळे बालिंगा जल उपसा केंद्रावर अवलंबून असणाऱ्या भागांमध्ये सोमवारी दैनंदिन पाणी पुरवठा होणार नाही. तसेच मंगळवारी अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

यामध्ये ए, बी, वॉर्ड त्याला संलग्नीत उपनगरे, ग्रामिण भाग व शहराअंतर्गत येणा-या लक्षतीर्थ वसाहत परिसर, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड परिसर, सानेगुरूजी वसाहत परिसर, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर परिसर, कणेरकरनगर परिसर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर परिसर, तुळजाभवानी कॉलनी परिसर, देवकर पाणंद परिसर, शिवाजीपेठ परिसर, मंगळवारपेठेचा काही भाग आहे.

तर सी, डी वॉर्ड :- दुधाळी परिसर, गंगावेश परिसर, उत्तरेश्वरपेठ परिसर, शुक्रवार पेठ परिसर, बुधवारपेठ तालिम परिसर, पापाची तिकटी परिसर, लक्ष्मीपुरी परिसर, सोमवारपेठ परिसर, बिंदुचौक परिसर, आझाद चौक परिसर, महालक्ष्मी मंदीर परिसर, मिरजकर तिकटी परिसर, देवलक्लब परिसर आदी भाग आहे.

या भागातील नागरीकांना दैनंदिन पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी महानगरपालिकेकडील उपलब्ध टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जाणार आहे. तरी या भागातील नागरीकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here