शहरातील ‘या’ भागाचा रविवारी, सोमवारी पाणीपुरवठा खंडित   

0
53

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिंगणापूर बंधाऱ्याची गळती काढण्याचे काम रविवारी (दि. २४) आणि सोमवारी (दि.२५) करण्यात येणार आहे. या कालावधीत शिंगणापूर पाणी उपसा प्रकिया पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे शहरातील ए, बी, ई, सी, डी या वॉर्डचा काही भाग वगळता व ग्रामीण भागात पाणीपुरवठा खंडित होणार आहे. तर मंगळवारी (दि.२६) पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल.

या कालावधीत नागरिकांना दैनंदिन पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने महापालिकेकडील उपलब्ध टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तरी या भागातील नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.