Published October 9, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील संपूर्ण ए, बी, सी, डी, वॉर्ड व त्यास सलग्नीत उपनगरे आणि ग्रामीण भागातील नळ कनेक्शन धारकांना कळविण्यात येते की बालिंगा अशुध्द जल आणि शुध्द जल उपसा केंद्राकडील ट्रान्सफॉर्मर बदलणे व स्टॅण्डबाय ट्रान्सफॉर्मर बसविणे तसेच बालिंगा जलशुध्दीकरण केंद्राकडील गळती काढण्याचे काम सोमवार दि. १२ ऑक्टोंबर रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवार दि. १२ ऑक्टोंबर रोजी होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे मंगळवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी होणारा पाणी पुरवठा अपुरा आणि कमी दाबाने होणार आहे.

ए,बी,सी,डी वॉर्डमधील उपनगरे, ग्रामिण भाग आणि शहराअंतर्गत येणारी ठिकाणे:

लक्षतिर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड परिसर, सानेगुरूजी वसाहत, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रातीसिंहनाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी परिसर, देवकर पाणंद, शिवाजी पेठ परिसर, मंगळवार पेठ काही भाग, दुधाळी, गंगावेश, उतरेश्वरपेठ, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ तालीम परिसर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, सोमवार पेठ, बिंदुचौक परिसर, आझाद चौक, महालक्ष्मी मंदीर, मिरजकर तिकटी परिसर इत्यादी भागातील नळ कनेक्शनधारकांना दैनंदिन होणारा पाणी पुरवठा अपूरा आणि कमी दाबाने होणार आहे.

तरी या भागातील नागरीकांना दैनंदिन पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेकडील उपलब्ध टँकर व्दारे पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील नागरीकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023