इचलकरंजी (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील तारदाळमधील संगमनगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. आठ ते दहा दिवसांनी पाणी येत असल्याने आणि ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.  

संगमनगरमध्ये यंदाही पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न निर्माण झाला असून पाणी हे फक्त आठ ते दहा दिवसातुन एकदाच येते. काही ठिकाणी याच भागामध्ये एक तास तर अन्य ठिकाणी दोन ते तीन तास पाण्याचा पुरवठा केला जातो. दररोज मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या कुटुंबाना दिवसभर काम करायचं का पाण्यासाठी दिवस घालवायचा असा प्रश्न पडला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडे मागणी करून देखिल याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.