मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनावर लसीकरण सुरू  असताना पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. ४२ दिवसांनंतर महाराष्ट्रात प्रथमच देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व  जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा कोरोना  चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत त्यांनी  स्वतः ट्विट करत  माहिती दिली आहे.

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र. तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी विनंती करतो. जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे. धन्यवाद! , असे पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.  दरम्यान, गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.