Published October 24, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील भडगाव येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे सरपंच, ग्रा. पं. सदस्य आणि शिवसैनिकांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार क्षीरसागर यांनी पाठपुरावा करून ‘राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम’ मधून पाणी प्रकल्प मंजूर करून आणला. याबद्दल भडगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा आज (शनिवार) सत्कार करण्यात आला.  

क्षीरसागर यांनी भडगाववासीयांच्या मागणीनुसार राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम आराखडा २०१८-१९ मधून शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प मंजुरीसाठी शिफारस केली. यासह वेळोवेळी पाठपुरावा केला. नुकतीच या प्रकल्पास मंजुरी मिळाली असून  यासाठी ९१ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यामुळे आज भडगाव ग्रामपंचायतीतर्फे क्षीरसागर यांचा साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करणेत आला. या वेळी सरपंच सौ. आनंदी चौगले यांनी पत्राद्वारे आभार मानत ग्रामसभा सभागृहात अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. या वेळी मारुती पुरीबुवा, उपसरपंच दिग्विजय पाटील, रामचंद्र चौगले, धोंडिराम भांडवले, आनंदा खोंद्रे, सुशांत भांडवले, स्वप्नील चौगले, निलेश पाटील, हरी सुतार, सुहास पाटील, व्यापारी महासंघाचे अमर क्षीरसागर उपस्थित होते.

October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023