मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई पोलिसांना माफिया,  मुंबईला पाकिस्तान बोलणाऱ्या ड्रग अॅडिक्ट ला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?, असा सवाल  करत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपच्या नेत्यांकडून शेतकरी आंदोलनाबद्दल खलिस्तानी, नक्षलवादी व देशद्रोही असल्याचा आरोप होत आहे. यावरून  भाजपने अभिनेत्री कंगना राणावतला पाठिंबा दिल्याची आठवण  करून देत काँग्रेसने खडेबोल सुनावले आहेत.

देशात अन्नदात्याचा सन्मान सर्वोतोपरी आहे. त्याला खलिस्तानी, नक्षलवादी व देशद्रोही म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांची साथ दिली. मुंबई पोलिसांना माफिया, मुंबईला पाकिस्तान बोलणाऱ्या ड्रग अॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?,  असा सवाल सावंत यांनी भाजपला केला आहे.