आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी ‘हात धुवा’ मोहिम यशस्वी करावी – डॉ.कादंबरी बलकवडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हात धुवा मोहिमेला अनन्यसाधारण महत्व असून कोरोनासह अन्य आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी हात धुवा मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आज येथे बोलतांना केले.

१५ ऑक्टोंबर हा जागतिक हात धुवा दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जात आहे, हात धुवा दिवसाच्या निमित्ताने कोल्हापूर महानगरपालिका व सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्विंस ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यामानाने शहरातील काही झोपडपट्टी परिसरामध्ये हात धुणाच्या पध्दतीबाबत माहिती देणाऱ्या चित्ररथाचा शुभारंभ आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते कपूर वसाहत येथे करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. हात धुवा दिवसानिमित्त हाताची स्वच्छता म्हणजे आजारापासून मुक्तता हा संदेश सर्वत्र चित्ररथाव्दारे देण्यात येत आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका सर्व स्तरावर प्रतिबंधक उपाययोजना राबवित असल्याचे सांगून आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे म्हणाल्या की, नागरिकांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, गर्दीत जाणे टाळणे यासह वारंवार साबनाने हात धुणे या गोष्टींना प्राधान्य देणे गरजेचे आहे.  हात धुण्याचे अनेक फायदे असून महापालिकेच्या हात धुवा मोहिमेत सक्रीय सहभाग घेऊन नागरिकांनी ही मोहिम यशस्वी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी हात धुण्याच्या पध्दती एस.यू.एम.ए.एन.एम (सरळ, उलटे, मूठ, अंगठा, नखं, मनगट) चे प्रात्यक्षिकही यावेळी उपस्थितांना दाखविण्यात आले. या चित्ररथाद्वारे शहरातील कपूर वसाहत, कदमवाडी, विचारेमाळ, सदरबाजार, निबांळकर माळ, जामसांडेकर माळ, टाकाळा खण, औचितनगर, यादवनगर तसेच शहरातील इतर झोपडपट्टी परिसर तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणार असून जागतिक हात धुवा दिवसानिमित्त हाताची स्वच्छता म्हणजे आजारापासून मुक्तता हा संदेश सर्वत्र देऊन हात धुवा मोहिमेचे महत्व नागरिकांना समजाऊन सांगण्यात येत आहे.

या कार्यक्रमास गटनेते सत्यजित कदम, नगरसेवक सुनिल कदम, नगरसेविका सौ.कविता माने, सौ.स्मिता माने, उपायुक्त निखिल मोरे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, माहिती शिक्षण व संवाद अधिकारी निलेश पोतदार, विभागीय आरोग्य निरिक्षक निखिल पाडळकर, आरोग्य निरिक्षक सुशांत कावडे, करण लाटवडे, श्रीराज होळकर, मुनिर फरास, सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्विंस ऑर्गनायझेशनचे सर्व पदाधिकारी व नागरीक आदी उपस्थित होते.

Live Marathi News

Recent Posts

आजपासून घरगुती गॅस सिलेंडरचे नवे दर लागू..

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर…

39 mins ago

नागपूरमध्ये केंद्र सरकारच्या पुतळ्याचे दहन..

नागपूर (प्रतिनिधी) : दिल्लीत सुरू असलेल्या…

2 hours ago

दहावी-बारावीच्या परीक्षा उशिरा..?

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व…

2 hours ago