कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे रणरागिणींचा गौरव

0
14

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नारीशक्तीचा सराफ व्यापारी संघातर्फे केलेला सन्मान हा आमचा अभिमान आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी केले.

नवरात्रोत्सवानिमित्त कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे ज्या घरातील कर्त्या पुरुषाच्या निधनानंतर आज त्यांचा व्यवसाय समर्थपणे सांभाळणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला.

राठोड म्हणाले, घरातील कर्त्या व्यक्तीच्या निधनानंतर आपला पारंपरिक व्यवसाय न डगमगता, अडचणींवर मात करीत सक्षमपणे व्यवसाय पुढे चालवणाऱ्या महिलांना येथून पुढेही व्यवसाय करताना काही समस्या आल्यास संघ त्यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असेल. माजी नगरसेविका माधुरी नकाते म्हणाल्या, चूल आणि मूल या पारंपरिक परिघातून महिला आज बाहेर पडून आज आपला व्यवसाय सांभाळत आहे. त्याबद्दल त्यांचा समाजात गौरव होणे उचित आहे.

मंगल गुंदेशा, छाया हावळ, नूतनदेवी अग्रवाल, शोभा पोवार, अश्विनी भस्मे, ज्योत्स्ना बागल, भाग्यश्री शेळके, जयश्री शेळके, शकुंतला पेडणेकर यांचा सत्कार माधुरी नकाते, प्रेमलता ईश्वर परमार, अनिता राजेश राठोड, वर्षा विजय हावळ आणि प्रभादेवी शिवाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सचिव तेजस धडाम, प्रीतम ओसवाल, उपाध्यक्ष विजय हावळ, संचालक शिवाजी पाटील, विजयकुमार भोसले, संजय रांगोळे, अशोककुमार ओसवाल, किरण गांधी, विशाल हावळ, संपत पाटील, राजू बारस्कर, दिनकर लाळगे यांच्यासह सभासद उपस्थित होते.