गांधीनगरमधील ‘त्या’ बांधकामावर कारवाईसाठी उद्या आत्मदहनाचा इशारा…

0
183

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाच्या जैसे थे आदेशाचा भंग करून गांधीनगर मेनरोडवरील गणेश चित्र मंदिराच्या समोरील छाब्रिया यांचे बांधकाम सुरु आहे. हे बांधकाम जमीनदोस्त न केल्याच्या निषेधार्थ उद्या (सोमवार) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पक्षाचे गांधीनगर शहराध्यक्ष अंकुश वराळे आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

हे बांधकाम विनापरवाना असून ते चक्क ओढ्यावर असल्याने त्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अंकुश वराळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. मात्र, त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिवाजी इंगवले यांनी दुर्लक्ष केले. मेन रोडवरील इतर बांधकामावर कारवाई होत असताना या बांधकामावर कारवाई न झाल्याने वराळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.