वारणा साखर कारखान्याच्या चेअरमन शोभाताई कोरे यांचे निधन

0
121

वारणानगर (प्रतिनिधी) : वारणा साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती शोभाताई कोरे यांचे आज (सोमवार) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर सोलापुरात उपचार सुरू होते. जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक, माजी मंत्री आणि आ. विनय कोरे यांच्या त्या मातोश्री होत.

सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या समाजकारणाचा वारसा त्यांनी समर्थपणे चालवला. वारणा बझार, वारणा महिला समूह, वारणा भगिनी मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली. विशेषतः महिला सबलीकरणामध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. शोभाताई कोरे यांच्या निधनाने वारणानगर परिसरासह पन्हाळा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.