कोल्हापूर शहरात प्रभागनिहाय घरगुती गणेश सजावट स्पर्धा : ‘लाईव्ह मराठी’चा ऑनलाईन उपक्रम

0
155

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील आघाडीचे न्यूज वेबपोर्टल असलेल्या लाईव्ह मराठीतर्फे कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक प्रभागातील एका उमेदवाराच्या सहकार्याने प्रभागनिहाय घरगुती गणेश सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रभागातील व्हायरल बाप्पाअशी अनोखी स्पर्धा आहे. या स्पर्धेत सर्वांना मोफत सहभागी होता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या स्पर्धेसाठी प्रत्येक प्रभागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

स्पर्धेचे स्वरुप..!

लाईव्ह मराठीच्या वतीने, kolhapurfestivals.com व मिडियाटेक यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्या घरगुती गणेश सजावट घेवून या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. १० सप्टेंबर 20२१ रोजी गणेश चतुर्थीच्या दिवसापासून आपल्या घरातील सजावट केलेल्या गणेशाचा व्हिडीओ पाठवायचा आहे. kolhapurfestivals.com या वेबसाईटवर अपलोड करायचे आहे. व्हिडिओ अपलोड करण्याची मुदत १५ सप्टेंबर पर्यंत राहणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचे मार्गदर्शन, व्हिडिओ रेकॉर्डिंगबाबतचे मार्गदर्शन, नियम व अटी kolhapurfestivals.com या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

विजेता कोण ठरणार ?

सर्वात जास्त लाईक्स, कमेंटस आणि शेअर मिळवणाऱ्या व्हिडिओंना बक्षीस मिळवण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेतील स्पर्धकाने आपल्या बाप्पाचा व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. प्रत्येक प्रभागात पहिल्या पाच स्पर्धकांना गुणानुक्रमे आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत. या बक्षिसांचे वितरण ज्या-त्या प्रभागातील प्रायोजकांद्वारे केले जाणार आहे. याशिवाय सर्व व्हिडीओंचे प्रभागनिहाय लाईव्ह मराठीच्या व kolhapurfestivals.com  च्या तज्ञांमार्फत परीक्षण केले जाणार आहेत. 

सर्व सहभागी स्पर्धकांना आयोजकांमार्फत ई- सहभाग प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. व्हिडिओ ‘लाईव्ह मराठी’ न्यूज चॅनेलवर प्रसिद्धही केले जाणार आहेत. 

प्रायोजक होऊन घरोघरी पोचण्याची संधी..!

शहरातील नगरसेवक पदाची आगामी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवार एक प्रभावी प्रचार माध्यम म्हणून ‘लाईव्ह मराठी’च्या उपक्रमास प्रायोजकत्व देत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या घरातील गणेशाची आकर्षक सजावट शहर व जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. तर सहभाग इच्छुक उमेदवार आपल्या प्रभागातील प्रत्येक घरात आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे.

या स्पर्धेचे तज्ज्ञ म्हणून कोल्हापुरातील मिडियाटेक ही कंपनी तंत्रज्ञान व सोशल मिडिया मार्केटिंगचे काम पाहत आहे.

सध्या या स्पर्धेसाठी ऑनलाईन नावनोंदणी सुरु आहे. नोंदणी केलेल्या स्पर्धकांना या स्पर्धेबाबतचे अपडेटस व्हॉटसअपवर मिळत राहतील.

या स्पर्धेचे प्रयोजक मिळवण्यासाठी नगरसेवक पदाच्या इच्छुक उमेदवारांनी ‘लाईव्ह मराठी’च्या खालील प्रतिनिधीशी संपर्क करावा.

दिपक निकम-9130957722

विजय पोवार-8087894001

निरंजन कामत-9325770757