कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापुरात कोरोनाचा  संसर्ग वाढू नये, दुसरी लाट येऊ नये, यासाठी  महापालिका प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. याचाच भाग म्हणून  सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिल्या आहेत.

दुकाने,  हॉटेल्स,  रेस्टॉरंट,  मंगल कार्यालय,  भाजी मार्केट याठिकाणी मास्क न वापरणे,  वाहन चालवताना चेहऱ्यावर अर्धवट मास्क लावणे. गर्दी करुन सोशल डिस्टंन्सचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तरी शहरातील सर्व नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा. दुकाने, आस्थापना, हॉटेल्स,  रेस्टॉरंन्ट, मंगल कार्यालये,  भाजी मार्केट याठिकाणी नागरिकांनी मास्क व सोशल डिस्टंन्सचे पालन करावे, आणि स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासक डॉ. बलकवडे यांनी केले आहे.