वाघापूरची नागपंचमी यात्रा रद्द…

0
135

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील वाघापूर येथील प्रसिद्ध नागदैवत जोतिर्लिंग मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशानुसार बंद आहे. यामुळे उद्या (शुक्रवार) होणारी नागपंचमी यात्रा रद्द केली आहे. याची भाविकांनी नोंद घेऊन देवस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन स्थानिक देवस्थान समिती अध्यक्ष अरविंद जठार, उपाध्यक्ष सदाशिव दाभोळे यांनी केले आहे.

वाघापूर येथे दरवर्षी नागपंचमीला मोठी यात्रा भरते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रेदिवशी गावात गर्दी होऊ नये यासाठी यात्रा रद्दचा निर्णय देवस्थान समिती आणि ग्रामपंचायतीने घेतला आहे. यामुळे नागपंचमीदिवशी मंदिर परिसर बंदिस्त केला जाणार आहे. शासन आदेश येईपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे.

यावेळी पोलीस पाटील दत्तात्रय घाटगे,  सरपंच जयश्री कुरडे, उपसरपंच  शुभांगी कांबळे, ग्रामसेवक तानाजी शिंदे, तलाठी कृष्णा जरग, दिलीप कुरडे, ग्रा.पं. सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.