कोल्हापूर (प्रतिनिधी) : वडणगेमध्ये बी.एच.दादा प्रेमी युवक मंच आणि कृषी विभागाच्या वतीने गावातील पूरग्रस्तांच्या शेतीचे पंचनाम्यांचे  फॉर्म भरण्याचा अभिनव उपक्रम राबवला. या युवक मंचने प्रत्येक महापूरावेळी अशाच प्रकारचे शिबिर घेऊन गावातील सर्व पंचनामे फॉर्म बीनचूक भरून दिले होते.  

यंदाच्या महापुरामुळे गावातील मोठ्या प्रमाणात पीकांचे नुकसान झाले आहे. शासनाने त्याचे पंचनामे करून घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. युवक मंचने तत्परता दाखवत एकही शेतकरी शासकीय योजनेपासून वंचित राहू नये यासाठी एकाच छताखाली ही योजना राबवली. यामध्ये ऑनलाइन उतारा काढणे, बिनचूक फॉर्म भरून देणे, झेरॉक्स, फॉर्म नमुने यासर्व सोईसुविधांसह सलग चार दिवस हे शिबिर घेण्यात आले होते. या शिबीराचा लाभ परिसरातील पूरग्रस्त शेतकऱ्यांनी घेतला. या शिबीरासाठी कृषी विभाग, तलाठी कार्यालय, वडणगे सोसायटी यांचे सहकार्य लाभले.

यावेळी युवक मंचचे रवींद्र पाटील, कृषी सहाय्यक टी. के. पाटील, पिराजी संकपाळ, अध्यक्ष युवराज साळोखे, उपाध्यक्ष सतीश चेचर, महादेव पाटील, महेश साखळकर, श्रीकांत नांगरे, सचिन दिंडे, पोपट चौगले, पिराजी मेथे, आदी उपस्थित होते.