बहिरेश्वर गावातील सरपंचपदाच्या अविश्वासदर्शक ठरावाबाबत उद्या मतदान…

0
67

सावरवाडी ( प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील बहिरेश्वर गावातील सरपंचपदाच्या अविश्वासदर्शक ठरावावर उद्या (गुरुवार) विशेष ग्रामसभा घेऊन मतदान होणार आहे. यामध्ये फक्त नोंदणीकृत मतदारांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. गावातील प्राथमिक शाळेच्या आवारात ही मतदान प्रक्रिया होणार असून मतदानासाठी गावात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.