धामणीखोऱ्यात मतदान सुरळीत

0 315

कळे (प्रतिनिधी) :  धामणीखोऱ्यातील  वेतवडे (ता. पन्हाळा) येथे आज (सोमवार) परीसरातील दहा गावांमध्ये नागरीकांनी मतदान केले. त्यामध्ये  कोदवडे,गोगवे, वेतवडे, पणोरे, हरपवडे, आंबर्डे, पणुत्रे आदी गावातील पुरुषांनी आणि महिलांनी मतदान केल्यामुळे धामणीखोऱ्यात ९२ टक्के मतदान झाले.  यावेळी गावातील विविध ठिकाणच्या बुथवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत होती. तसेच बुथवरील अधिकाऱ्यांकडूनही योग्य नियोजन लावण्यात येत होते. ठिकठिकाणी स्थानिक नेते व कार्यकर्त्यांच्यात कमालीचा उत्साह दिसून येत होता. 

         

अनेक  ठिकाणी मुख्य रस्त्यापासून लांब आणि टेकडावर असणाऱ्या बुथवर ज्यांना जाता येत नाही, अशा  वयोवृद्ध मतदारांना कार्यकर्त्यांनी    उचलून अथवा हाताला धरून घेऊन जात असल्याचे दिसत होते. यामध्ये वेतवडे येथील तारुबाई मारुती पवार (वय १०४), रखमाबाई भिकु पाटील (वय १००), आनंदीबाई दादु पाटील (वय १०१  या वयोवृद्ध महिलांनी चालत जाऊन मतदान केले.

 

तसेच बुथवर विविध पक्षाच्या उमेदवारांचे पुलिंग एजंट अतिशय सतर्क राहून मतदानावर लक्ष ठेऊन होते. त्यामुळे वेतवडे परिसरात विधानसभा निवडणुकीचा मतदानाचा टप्पा अखेर सुरळीतपणे पार पडला.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More