`विठ्ठल’चा गड जिंकला आता पुढे …….

0
43

पंढरपूर ( प्रतिनिधी)-

“जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, आणि नगरपालिका या निवडणुका आपण लढणार आहोत” असे मत विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत आबा पाटील यांनी केले निमित्त होते निमंत्रित संचालक निवडीचे.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळखला जातो. हा राजवाड्याला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आणण्यासाठी चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी तळागाळातील शेतकरी सभासदांना तसेच कार्यकर्त्यांना श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे निमंत्रित संचालक म्हणून निवड करणार असा शब्द दिला होता. या शब्दाचे पालन करीत आज रोजी चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील विविध ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना निमंत्रित संचालक म्हणून निवड केली गेली. यामध्ये धनाजी ज्ञानेश्वर खरात, सचिन अरुण शिंदे, तानाजी विष्णू बागल, उमेश बाळू मोरे, अंगद उद्धव चिखलकर, अशोक महादेव घाडगे, गणेश भिका ननवरे, समाधान तुकाराम गाजरे अशा तळागाळातील कार्यकर्त्यांना निमंत्रित संचालक म्हणून निवड करण्यात आली.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तळागाळातील कार्यकर्त्यांनी आपल्याला मदत केली. या कार्यकर्त्यांच्या भरवशावर व मदतीने जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती आणि पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक लढवणार असे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी या निमंत्रित संचालक निवडीच्या वेळी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक डॉ. बीपी रोंगे सर तसेच व्हा. चेअरमन प्रेमलता बब्रुवाहन रोंगे आणि सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.