आ. चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते विश्वजित शिंदेचा सत्कार

0
165

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय १९ वर्षाखालील युवा फुटबॉल संघात निवड झाल्याबद्दल विश्वजीत शिंदे याचा आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विश्वजित हा फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटी (एफसी) संघाचा खेळाडू आहे. यापूर्वी भारतीय महासंघामार्फत कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनच्यावतीने घेण्यात आलेल्या निवड चाचणीतून विश्वजीतची १६ वर्षाखालील भारतीय युवा फुटबॉल संघात निवड झाली होती. यावेळी भारतीय संघातून विश्वजीतने उत्कृष्ट खेळ केला होता.  या खेळीच्या जोरावर १९ वर्षाखालील भारतीय युवा फुटबॉल संघात त्याची निवड झाली आहे. याबद्दल आमदार जाधव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व फुटबॉल कीट देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी नगरसेवक संभाजी जाधव, अमित पवार, युवराज पाटील, सचिन पायमल, अनुप चौगुले आदी उपस्थित होते.