विशाल भोगम मित्रमंडळाकडून पंचगंगा स्माशनभूमीला २ ट्रॉली लाकूड दान

0
454

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील विशाल गजानन भोगम आणि त्यांच्या मित्र मंडळाच्या सदस्यांनी महापालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीला २ ट्रॉली लाकूड दान केले.

आचार विचारांचे आदर्श मूल्य जपत एक आदर्श सामाजिक संकल्पना रूजविण्याच्या दृष्टीने एक आगळा वेगळा नवा संदेश देऊन समाजासाठी योगदान देण्याचे पवित्र कार्य भोगम आणि त्यांच्या मित्रमंडळींनी केले आहे. 

या कामी युवराज साळोखे, चेतन साळोखे, अतुल भालकर, कुणाल जाधव, शाहू भोईटे, शुभम नलवडे, सागर पाटोळे, प्रतिक साळोखे, रितेश राजवाडे, कुमार मोरे, समर्थ नवाळे यांचे मोठे सहकार्य लाभले.