विराट, अनुष्काच्या घरी एकही नाही नोकर : कसे करतात घरकाम..?    

0
303

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का हे नेहमीच चर्चेत असतात. या वलयांकित जोडप्याबाबत सर्वांनाच जाणून घेण्याची उत्सुकता असते. आता या जोडीबद्दल माजी भारतीय क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय निवडकर्ता सरनदीप सिंग यांनी  खुलासा करताना सांगितले की, विराट आणि अनुष्का यांच्या मुंबईतील घरात एकही नोकर नाही.

विराट आणि अनुष्काच्या घरी एकही नोकर नाही.  घरी आलेल्या पाहुण्यांसाठी विराट आणि अनुष्का स्वतःच जेवण करतात. आणि  पाहुण्यांच्या ताटात जेवण वाढतात.  तुम्ही अजून काय अपेक्षा करू शकता?  विराट नेहमी आपल्याजवळ बसतो. आपल्यासोबत बातचीत करतो, गप्पा मारतो. तो आपल्यासोबत डिनरसाठी बाहेरही येतो. सगळे खेळाडू त्याचा खूप आदर करतात. तो डाउन टू अर्थ आणि मजबूत इच्छाशक्ती असणारा व्यक्ती आहे, असेही  सिंग यांनी सांगितले. विराट नेहमीच आउटिंग, गप्पा आणि क्वॉलिटी टाईम घालवण्यासाठी तयार असतो. तुम्ही विराटसारख्या व्यक्तीकडून यापेक्षा अधिक काय अपेक्षा करू शकता, असे म्हणत विराट आणि अनुष्का यांच्या पाहुणचाराबद्दल सरनदीप यांनी कौतुक केले आहे.