टोप तंटामुक्त अध्यक्षपदी विनोद पाटील, उपाध्यक्षपदी पांडूरंग पाटील

0
203

टोप (प्रतिनिधी) : टोप ग्रामपंचायतीवर शिवसेना प्रणित आघाडीची एकहाती सत्ता असून गेले तीन वर्ष तंटामुक्त अध्यक्षपद बाळासो चव्हाण यांनी भूषवले. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याने रोटेशन पद्दतीने अध्यक्षपद विनोद पाटील यांना देण्यात आले. तर उपाध्यक्षपदी पांडूरंग पाटील यांची निवड करण्यात आली. 

दरम्यान, डॉ. प्रदिप पाटील यांची हातकणंगले पंचायत समिती सभापतीपदी निवड झाल्याबद्दल टोप ग्रामपंचायतीमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच रुपाली तावडे, उपसरपंच संग्राम लोहार, विठ्ठल पाटील, शिवाजी पाटील, राजू कोळी, रंजना पाटील, आयेशाबी मुल्ला, अंजना सुतार, गब्बर पाटील, माणिक पाटील, विश्वास कुरणे, ग्रामविकास अधिकारी डी. आर. देवकाते आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.