डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या विदर्भ अध्यक्षपदी विनोद देशमुख

0
51

मुंबई (प्रतिनिधी) : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या विदर्भ विभागच्या अध्यक्षपदी ख्यातनाम संपादक विनोद देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.  संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी निवडीचे पत्र देशमुख यांना दिले.

विदर्भाच्या माध्यम विश्वात विनोद देशमुख यांच्या पत्रकारितेचा आदराने उल्लेख होतो.  दैनिक तरुण भारतच्या नागपूर आवृतीत  त्यांनी गुणवत्ता आणि परिश्रमाच्या बळावर मुद्रित शोधक पदापासून संपादकपदापर्यंत यशस्वी मजल मारली.  नागपूर आणि विदर्भातील पत्रकारांचे संघटन करण्यातही त्यांची नेहमीच उल्लेखनीय भूमिका राहिली. डिजिटल माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक घटकाचे हित जपतानाच सामाजिक व पत्रकारिता मूल्य जोपासण्याचे उद्दीष्ट ठेवून त्यांनी विदर्भ अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.